लक्ष्मी कन्स्ट्रक्शनकडून होणार सुमारे एक कोटी रुपये वसूल

0

साहेबराव पाटील यांनी केलेल्या अपिलावर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

पाचोरा,. दि . 7 –
पाचोरा येथील राजीव गांधी टाऊन हॉल व व्यापारी संकुलाचे बांधकाम बांधा व वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन ने काम घेतले आहे. परंतु सदरीत काम हे मुदतीत न झाल्याने लक्ष्मी कन्स्ट्रक्शन ने पालिकेकडे अर्ज देऊन 31/03/2018 पर्यंत गाळे वितरित करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. लक्ष्मी कन्स्ट्रक्शन च्या विनंती अर्जानुसार पालिकेने 22/02/2017 रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन करून ठराव क्र.200 हा चर्चेस आल्यानंतर विषयाचे वाचन होण्यापूर्वी जनाधार विकास आघाडीचे नगरसेवक अमोल शिंदे यांच्यासह 5 भाजपचे असे 8 सदस्य सभागृहा बाहेर निघून गेले होते. त्या नंतर सेना व भाजप च्या सदस्यांनी उपकोरण पूर्ण करून ठराव पारित केला. या ठरावावर सेनेचे उपनगराध्यक्ष शरद पाटे हे सूचक तर राष्ट्रवादी चे नगरसेवक वासुदेव माळी हे अनुमोदक आहेत. उशिरा झालेल्या कामामुळे पालिकेचे नुकसान होत असल्याने साहेबराव पाटील यांनी एस.आर.20/2018 रोजी सदरचा ठराव तहकूब करण्यासाठी अपील दाखल केले होते. यावर सुनावणी होऊन सदरचा ठराव रद्द करावा व तहकुबीमुळे होणार्‍या परिणामानुसार विकासाका (लक्ष्मी कन्स्ट्रक्शन) कडून योग्य ती रक्कम वसूल करावी असा आदेश पारित करण्यात आला आहे.
येथील राजीव गांधी टाऊन हॉल व व्यापारी संकुलाचे काम येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला बांधा आणि वापरा या तत्त्वावर दिल्यानंतर त्यामधे 11 अटी व शर्ती शासनाच्या आदेशात नमूद केलेल्या असतांना अट क्रं. 9 मधे बांधकाम पूर्ण झाल्याच्या कालावधी नंतर भाडे तत्वावर न दिलेली दुकाने / गाळे ही विकासकास (कॉन्ट्रक्टर) आवश्यक ते भाडे नगरपरीषदेस भरणे बंधनकारक राहील असे नमूद केलेले आहे. परंतु लक्ष्मी कन्स्ट्रक्शन ने 14/02/2017 रोजी अर्ज देऊन 2 वर्ष गाळे विक्रीसाठी मुदत वाढीची मागणी केली होती. त्या नुसार नगरपरिषदेने 22/02/2017 रोजी सर्व साधारण सभा घेऊन मुदतवाढीचा ठराव मंजूर केला होता. यामुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याने येथील साहेबराव गजमल पाटील यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या अपिलाचा निकाल 04/01/2019 रोजी लागून जिल्हा अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ठराव क्र. 200 रद्द करून तहकुबीमुळे होणारे परिणामानुसार विकासाका कडून (लक्ष्मी कन्स्ट्रक्शन) वसूल करावी असा आदेश पारित केला असून यात बांधकाम पूर्ण होईपर्यंत चे भाडे 56 लाख 32 हजार 61 रुपये व त्यानंतर 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत सुमारे 1 लाख रुपये वसुली होण्याचे संकेत साहेबराव पाटील यांनी पत्रकार परिषदे द्वारे दिले. या शिवाय या साधारण सभेस उपस्थित असलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कार्यवाई करणे व लक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी अपील करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
याशिवाय कोणत्याही कामांचे जी संस्था बांधकाम करित असते त्या संस्थेस स्वर्खाने विज कनेक्शन घेवुन आलेले विज बिल स्वत: भरायचे असते मात्र या ठिकाणी पालिकेने स्वत: विज कनेक्शन घेवुन राजीव गांधी टाऊन हॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांचे लाखो रुपये विज बिल पालिकेनेच भरले. एकीकडे शहरातील नागरिकांना सर्रासपणे पालिकेने 10 टक्के करवाढ केली तर दुसरीकडे एका व्यावसायिकाचे लाखो रुपये विज बिल पालिका भरत असल्याने पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदारांमध्ये मोठे गौडबंगाल सुरु असल्याचेही साहेबराव पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.