र.ना.देशमुख महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

0

भडगाव;-  सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान ग्रंथ व भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.याप्रसंगी ‘संविधानाचे स्वरूप’ या विषयावर प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.ए. एन. भंगाळे यांचे व्याख्यान झाले.

ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्राध्यापक विद्यार्थी व कर्मचारी मिळून एकूण ६० लोकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. जी. शेलार यांनी केले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास साहाय्यक अधिकारी डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी प्रा. आर. एम. गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.