रेल्वे स्थानकावर अनधिकृत व्हेंडर्सला प्रतिबंध

0

भुसावळ :- मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात अनाधिकृत हॉकरांवर अंकुश लावण्यासाठी व अधिकृत स्टॉल वरील लायसन्सधार्यांना फलाटांवर विक्रीसाठी मान्याता देण्यात आली आहे.

या अंतर्गत भुसावळ विभागातील मंडळातील स्थानकांमध्ये नासिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापुर, बडनेरा आदी स्थानकांवर अधिकृत खानपान लायसन्सधारी 286 व्हेंडर्सना फलाटांवर वस्तू व खाद्य पदार्थ विक्रीला मान्याता दिली आहे. या व्हेंडर्सला गणवेश व पोषाख देण्यात आले आहे. यामुळे अनाधिकृत हॉकर्स वर आळा बसण्यास मदत होईल. यामुळे ग्राहकांना स्थानकावर चांगली सुविधा मिळणार आहे. स्थानक हॉकर्समुक्त करण्यासाठी आरपीएफच्या समन्वयात अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध अभियान सुरु करण्यात आले आहे. स्थानकांवरील स्टॉलवर इलेक्ट्रॉनिक बिलिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खाद्य पदार्थांची अधिक दराने होणारी विक्री थांबविण्यासाठी दि. 2 ते 11 जुले पर्यंत नो बिल, नो पेमेंट अभियान राबविण्यात आले. यात प्रवासी ग्राहकांमध्ये जागरुकता व स्थानक व स्टॉलवर पोस्टर चिटकविण्यात आले..

Leave A Reply

Your email address will not be published.