लोकोपायलट यांचे विविध मागण्या करिता उपोषण सुरु

0

17 जुलै पासून चक्का जाम चा इशारा

भुसावळ :- ऑल इंडिया रेल्वे रनिंग स्टॉफ लोकोपायलट यांचे विविध प्रलंबित मागन्याकरीता येथील प्लटफॉर्म क्रमांक 4 वर  दि 15 जुलै पासून उपोषण सुरु केले असून या मागण्या लवकरात लवकर मंजूर न झाल्यास 17 जुलै पासून ” चक्का जाम करणार असल्याचा इशारा यावेळी लोकोपायलट असोसिएशन ने दिला आहे .

गेल्या महिन्यात येथील श्रीकृष्णचन्द्र सभागृहात ऑल इंडिया रनिग स्टॉफ ची बैठक झाली होती  याअनुषंगाने आज 15 जुलै पासून 32 तास उपाशीपोटी राहून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे .  या उपोषणात  भुसावळ विभागातील सर्व डेपो सहित क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था  तसेच हजारो संख्येने लोको रनिंग स्टॉफ (लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट , शन्टर ) हे सुद्धा सहभागी झाले  आहेत .

न्याय प्रविष्ठ मागन्यासंदर्भात संपूर्ण भारतात रेल्वेच्या प्रत्येक विभागात  हे आंदोलन करण्यात येत आहे . रेल्वे बोर्डाच्या उदासिनतेमुळे मागण्या कड़े लोकोपायलट यांच्यावर उपासमारीची  वेळ आली आहे.

लोकोपायलट यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –

रेल्वेचे खाजगीकरण व ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी , रनिंग स्टॉफ चे  किलोमीटर भत्ता रेल्वेचे कायद्यानुसार 1 जानेवारी 2016 नुसार रक्कम देण्यात यावी.

नॅशनल पेंशन स्कीम रद्द करून ओपीएस लागू करण्यात यावा , 1 जानेवारी 2016 च्या आधी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या पे कमिशन मधील फरक दूर करावा . सेफ्टी रिव्ह कमिटिला लागू करण्यात यावे ,रनिंग स्टाफ़च्या असुरक्षित व बिना गार्ड च्या योग्य नियमानुसार कमी करणे बंद करण्यात यावे . आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.