रेल्वेला धडकल्याने दहा शेळ्या दगावल्या

0

कुत्र्यांचा कळप  मागे लागल्याने धावत होत्या शेळ्या

पाचोरा,-

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूलाजवळ काही अंतरावर 62 वर्षाचे वृद्ध नेहमी प्रमाणे शेळ्या चारत असताना अचानक 15-20 कुत्र्यांचा कळप शेळ्यांच्या पाठीमागे धावल्याने शेळ्या घाबरून सैरावैरा पळत सुटल्या. दरम्यान पाचोरा येथे न थांबणारा सुपर एक्सप्रेस जात असल्याने रेल्वेच्या डब्याला धडकल्याने 10 शेळ्या दगावल्या असून यात सुमारे 1 लाख 25 हजाराचे नुकसान झाल्याची घटना घडलेल्या प्रकारामुळे ममाझ्या आयुष्याची कमाईच गेलीफ अस सांगून वृद्ध इसम ढसा ढसा रडत होते.

पाचोरा येथील भडगाव रोड लगतच्या हायवेला लागून असलेल्या स्टेट बँक कॉलोनीत तुकाराम सहादू कांबळे हे (वय 62) हे इसम आपल्या कुटुंबियांसह रहातात. त्यानी गेल्या 7 वर्षांपूर्वी 2 शेळ्या विकत घेतल्या होत्या. त्यांचा सांभाळ करून शेळ्यांची संख्या 20 पर्यंत जाऊन पोहचली होती. अडीअडचणीच्या काळात एखादी शेळी किंवा शेळीचे पिल्लू विकून ते कुटुंबियांची अडचण भागवत असत. मात्र दि. 11 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान तुकाराम कांबळे हे नेहमी प्रमाणे रेल्वे रुळापासून 40-50 मिटर अंतरावर शेळ्या चारत होते. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूनी शहरातील मांसविक्रीचा व्यवसाय करणारे कोंबडीचे पीस व उर्वरित मास फेकून देत असल्याने या ठिकाणी नेहमीच मास खाण्यासाठी कुत्र्यांचे कळप असतात. या वेळी कुत्र्यांचे शेळ्यांकडे लक्ष गेल्याने 15-20 कुत्रे शेळ्यांकडे धावत आले. घाबरलेल्या अवस्थेत शेळ्या पळ काढत असतानाच मुंबई हुन भुसावळ कडे भरधाव वेगाने सुपर एक्सप्रेस जात होते. रेल्वे चे इंजिन पास झाल्या नंतर शेळ्या तिसर्‍या चौथ्या डब्याला धडकल्याने त्यात 10 शेळ्या मृत्युमुखी पडल्या व मजुरी करणार्‍या वृद्धाचे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले.

 

*भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूस रस्त्याच्या कडेलाच नगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड तयार केलेले असून संपूर्ण शहराचा कचरा या ठिकाणी टाकला जातो. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मांस विक्रीचा व्यवसाय चालत असल्याने मांस विक्री करणारे कोंबड्याचे पंख व उर्वरीत मांसाचे तुकडे उघड्यावर फेकत असल्याने या ठिकाणी सतत कुत्र्यांचे कळप असतात. रस्त्याच्या दोन्ही भागात कुत्रे फिरत असल्याने ये-जा करणार्‍या वाहन धारकांचा ते पाठलाग करत असल्याने या जागेवर नेहमीच अपघात होत असतात. शेळ्या दगवल्याचा प्रकार याच कारणामुळे घडल्याने झालेल्या नुकसानीस कुणास जबाबदार धरावे? शेळ्यांचे संगोपन करून 12 जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ भागविणार्या वृद्धास नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षाही तुकाराम कांबळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.