रेल्वेच्या धडकेत सुरक्षा जवानाचा मृत्यू

0

भुसावळ – सावदा रेल्वे स्थानकावर पेट्रोलिंग करीत असतांना गाडी क्र. 13201 जनता एक्सप्रच्या इंजिनाच्या धडकेत येथील रेल्वे सुरक्षा बलाचे हे. काँ. चंद्रकांत आढाळकर यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. 15 मे रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील रेल्वे यार्ड आरपीएफचे हे.काँ. चंद्रकांत आढळकर (वय 55, रा.सहकार नगर, भुसावळ) हे सावदा येथे रेल्वे मार्गावर रावेरच्या दिशेने पेट्रोलिंग करित असतांना खंबा क्र.549,/29ते 31 अप मार्गावर गाडी क्र.13201 जनता एक्सप्रेसच्या इंजिनाचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या सोबत आरपीएफचे श्री. देशमाने होते त्यांनी संबंधितांना सुचना दिली. याबाबत स्टेशन मास्तरांच्या खबरीवरुन लोहमार्ग पोलिसात 62/ 19 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.तपास पीएसआय संजय साळुंखे करित आहे.

दरम्यान, मयत हे.काँ. चंद्रकांत आढाळकर यांचा परिवार बाहेरगावी गेला असल्यामुळे. आढळकर यांचा मृतदेह रेल्वे हॉस्पिटल येथे शितपेटीमध्ये ठेवण्यात आला आहे.दि.16 रोजी नातेवाईक घरी परतल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पंधरवाड्यात तीन आरपीएफचा मृत्यूर्ड़ी2358?ुपिवीुं0- दरम्यान, येथील रल्वे सुरक्षा बलातील कर्मचारी मिलिंद देशमुख यांना दि. 6 मे रोजी कर्नाटक राज्यात झालेल्या अपघातात परिवारासह मृत्यू झाला त्यानंतर दि. 8 मे रोजी आरपीएफचे जवान  गौतम शिंदे (रा. मोहित नगर) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती . त्यांनत दि. 15 रोजी आरपीएफचे हे.काँ. चंद्रकांत आढाळकर यांचा ऑन ड्युटी अपघाती मृत्यु झाला. यामुळे आरपीएफ विभागात शोककळा  परसली आहे.

कर्तव्य बजावतांना तीन रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यु- महिन्याच्या सुरुवातीला दि.4 मे रोजी वरिष्ठ अभियंता राजेश भिमराज मायकल यांचा ड्युटीवर असतांना रेल्वे पुलाजवळ रेल्वेचा धक्का लागून तर दि. 11 रोजी की-मॅन धुनी बद्री ठाकूर यांचा कर्तव्या बजावतांना झेडटीएस जवळ मालगाडीखाली सापडून तर दि. 15 रोजी आरपीएफचे हे.काँ.चंद्रकांत आढाळकर यांचा पेट्रोलिंग दरम्यान रेल्वे इंजिनाचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने मयत कर्मचार्यांबद्दल तत्परता दाखवत कर्मचार्यांच्या देयक रक्कमा दोन दिवसात उपलब्ध करुन वारसांना दिल्याव व अनुकंपाचा लाभही दिला आहे. भुसावळ येथील शांतीनगर भागातील सहकार नगर येथे टेक्निकल हायस्कुल जवळ राहणारे मयत आरपीएफ चंद्रकांत अढळकर यांचे पश्चात पत्नी दोन मुले व   एक मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.