अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून मतमोजणी करावी- डॉ. ढाकणे

0

जळगाव – लोकसभानिवडणूक 2019 च्या 03 जळगाव, 04 रावेर मतदारसंघाच्या मतमोजणी साठी नियुक्त केलेल्या सर्व समन्वय अधिकार्‍यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.

लोकसभानिवडणूक 2019 च्या 03 जळगाव, 04 रावेरलोकसभा मतदारसंघात दिनांक 23 एप्रिल रोजीझालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी जळगाव येथे होणार आहे.त्या अनुषंगाने आज दिनांक 15 मे 2019 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात मतमोजणीपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, विशेष भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार शरद मंडलिक, मंदार कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, सुरेश सुभाष दळवी, कैलास देवरे, थोरात, मिलींद कुलकर्णी, नायब तहसिलदार सुनिल रामदाणे, कळसकर, लेखाधिकारी नितीनउ ंबरकर आदि मतमोजणीकामी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.