रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाची धडक ; भुसावळच्या डॉक्टर ठार

0

भुसावळ (प्रतिनिधी) | येथून जवळ असलेल्या साकेगावजवळ अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेस धडक दिल्याने झालेल्या अपघातात भुसावळ येथील डॉ. अंशुला पाटील या जागीच ठार झाल्या. तर चालक गंभीर जखमी झाला.ही घटना रात्री ११ च्या सुमारास घडलीय.

भुसावळ तालुक्यातील ही १०८ रुग्णवाहिका (एमएच १४, सीएल ०८०१)वर समाधान अनिल पाटील (वय २७, रा.भुसावळ) हा चालक आहे. गुरुवारी रात्री चालक समाधान व डॉ.अंशुला या रुग्णवाहिकेने जळगावला येत होत्या. साकेगावजवळील कपूर पेट्रोलपंपासमोर या रुग्णवाहिकेस एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात डॉ.अंशुला यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक समाधान हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, संतोष इदा हे घटनास्थळी पोहोचले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.