रिझर्व्ह बँकेचे रेपो दर ‘जैसे थे’च

0

नवी दिल्ली : रिजर्व्ह बँकेने आज गुरुवारी रेपो रेट जाहीर केले आहेत. मात्र, रिजर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थेच ठेवले आहेत. बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही. यामुळे रेपो रेट ५.१५ % तर रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्के कायम आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

अर्थव्यवस्थाही सध्या रुसलेली असल्याने परिस्थितीला सामोरे जात मार्ग काढण्याची गरज आहे. पुन्हा व्याज दरातील कपातीने बांधकाम क्षेत्रात नवचैतन्य परतण्याची अपेक्षा होती. मात्र, रिजर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थेच ठेवल्याने बाजारात निराशाचे वातावरण राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने वित्तीय वर्ष २०१९-२०२०मधील जीडीपीचा अंदाज ६.१ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.