रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घ्यावी ; जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्यावतीने कृषिमंत्री ना. भूसे यांना निवेदन

0

भुसावळ (प्रतिनिधी) : रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घेण्यासाठी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्यावतीने आज दि.१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांना ईमेल द्वारा निवेदन देण्यात आले.

मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना या महामारीने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असतांना केंद्र सरकार मात्र दैनंदिन पेट्रोल,डिझेल, घरघुती गॅस यासारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर  लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोसळून पडलेली असतांना आता पुन्हा नव्याने खत कंपन्यांनी शेतकऱ्याचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे.खतांची दरवाढ होणार नसल्याचे रसायने व खत विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी जाहीर केलेले असतांना देखील बाजारात मात्र वाढीव दराने खत विक्री सुरू आहे.केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून काही कंपन्या शेतकऱ्यांची घोर फसवणूक करीत आहे.केंद्र किंवा राज्य सरकार या मुद्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.उलट त्यांच्यावर कार्यवाई करण्या ऐवजी साफ दुर्लक्ष करीत आहे.खरीप हंगाम तोंडावर असतांना शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दरांबाबत संभ्रम आहे.परिणामी शेतकरी खत घेण्यास तयार नाहीत.वास्तविक गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना सलग नैसर्गिक आपत्तीस तोंड द्यावे लागत असून यामुळे उत्पादनास प्रचंड घट येऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.अगदी त्यांनी उत्पादनावर केलेला खर्च देखील निघत नाही ही वस्तुस्थिती असतांना कंपन्यांनी खतांच्या किंमतीत भरघोस वाढ करून जगाचा पोशंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी फुसले आहे असेही विवेक नरवाडे यांनी म्हटले आहे.

ज्या खत कंपन्यांनी रासायनिक खते व बी-बियाण्यांची दरवाढ केलेली आहे त्या कंपन्याना केलेली दरवाढ मागे घेणेसाठी आपले स्स्तरावरुन योग्य ते निर्देश द्यावेत अन्यथा काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही जिल्हाकार्याध्यक्ष  नरवाडे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.