राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांची उद्या जिल्ह्यात संवाद यात्रा

0

जळगाव (प्रतिनिधी) | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे २७ अाणि २८ अाॅगस्ट राेजी जिल्हा दाैऱ्यावर येत अाहेत. संवाद यात्रेनिमित्त त्या चाळीसगाव, पाराेळा अाणि जळगावमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार अाहेत. २७ राेजी संध्याकाळी ७ वाजता खासदार सुळे चाळीसगाव येथे येणार अाहेत.

शहरातील काही विधिज्ञ, व्यापारी, व्यावसायीक यांच्याशी सर्किट हाऊस येथे हा संवाद अायाेजीत करण्यात अाला अाहे. २८ अाॅगस्ट राेजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद, ११ वाजता कनाशी येथे देवदर्शन अाणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अाहेत. १२ वाजता पाराेळा येथे शहरातील विधिज्ञ, व्यापारी, डाॅक्टर्स, व्यावसायीक यांच्याशी संवाद साधणार अाहेत. दुपारी ४ वाजता जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधणार अाहेत. सायंकाळी ४.३० वाजता जळगाव येथे पक्ष कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाेबत बैठक घेतील.

Leave A Reply

Your email address will not be published.