रावेरचा पारा ४९ अंश सेल्सिअसवर

0

तापमानामुळे ग्रीन झोन होरपळला

रावेर । उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. मे हिटचा तडाखा बसण्यापुर्वीच सुर्याने आग ओकण्यास सुरवात केली असून, जळगाव जिल्ह्यातील रावेरात ४९ अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. यामुळे सुपर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे असून, जिल्ह्यात अघोषित संचारबंदी लागली आहे.

रावेर परिसराला ग्रीन झोन समजले जाते. याठिकाणी असलेल्या केळी बेल्टमुळे तापमान नियंत्रित राखले जात असल्याचा आभास शेतकर्‍यांना होता. मात्र तीन-चार दिवसापासून 45 पार गेलेल्या तापमानाने हा आभास मोडून काढला आहे. रावेरात रविवारी चार वाजता 49 डिग्री तापमान पोहोचले होते.कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे रस्ते, बसस्थानक देखील ओस पडलेले दिसून आले. प्रचंड तापमान असल्याने अंगाची लाही लाही होत असल्याने, नागरिक वाढत्या तापमानाने घाबरले आहेत. वाढते तापमान व पाणी पातळीत दररोज होणारी घट केळी बेल्टमध्ये धोक्याची सूचना देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.