रामनगर घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल

0

जळगाव, दि.22 –
शहरातील शिरसोली नाका परिसरातील रामनगरात झालेल्या घरफोडी प्रकरणी आज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राबीयाबी खान यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवार 21 रोजी दुपारी उघडकीस आली होती.
शहरातील रामनगर, शिरसोली नाका येथील रहिवासी राबीयाबी तुराब खान हे 5 पेैब्रुवारी रोजी मक्का मदीना येथे हजयात्रेला गेल्या होत्या. दरम्यान, 20 रोजी दुपारी 4 ते 21 रोजी 4 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून कपाटातील काही मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली होती. बुधवार 21 रोजी दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, राबीयाबी तुराब खान या जळगावी परतल्यानंतर आज त्यांच्या फिर्यादीवरुन औद्योगिक वसाहत पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी निंबाळकर करीत आहेत.
12 हजाराची रोकड लंपास
चोरट्यांनी कपाटातील 12 हजार रुपये रोख चोरुन नेल्याचे राबीयाबी खान यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.