राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : विखे-पाटील, क्षीरसागरांना मंत्रिपद?

0

मुंबई :- मुंबई :- लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा अजून बाकी असतानाच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेच्या निकालानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे. यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली उच्च पातळीवर जोरदारपणे सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने लोकसभेचे तिकीट दिले होते. विखे यांनी भाजप व शिवसेनेचा उघड प्रचार लोकसभा निवडणुकी दरम्यान केला होता. त्याचबरोबर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी ही उघडपणे भाजपचा प्रचार केला. जर राज्यात लोकसभेत महायुतीला जनेतेने कौल दिल्यास काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सुजय विखे यांनी नगरमध्ये बाजी मारल्यास राधाकृष्ण विखे पाटलांना मोठे खाते मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.