राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अजब कारभार

0

खामगाव (गणेश भेरडे) ःः राज्य उत्पादन शुल्क खामगाव विभागाने काल 3 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुक्यात बनावट देशी दारु व वाहनांसह 5 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती निरीक्षक आर.एन.गावंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना दिली आहे. सदर कार्यवाही वाखाखण्याजोगी असली तरी पाऊस सासरी अन पूर माहेरी असे बोलल्या जात आहे. कारण खामगाव शहरात दारूच्या बाबतीत इतकी धांदली सुरू असतांना इतरत्र केलेली कारवाई शंकेला वाव देत असून त्यामुुळेच पाऊस सासरी अन पूर माहेरी असे उपहासाने बोलले जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग खामगाव यांच्या 3 एप्रिल 2021 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकानुसार राज्य उत्पादन शुल्क, बुलडाणा विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.एन.गावंडे व दुय्यम निरीक्षक एन.के.मावळे तसेच त्यांचे पथकातील सह.दुय्यम निरीक्षक जि.एन.सोनकांबळे, जवान अमोल सुसरे, गणेश मोरे, पी.एस.देशमुख व महिला जवान सौ.शारदा निळे यांना मिळालेल्या गुप्त व खात्रीलायक माहिती नुसार जळगाव जामोद ते वरवट बकाल रोडवर संग्रामपूर तालुक्यातील शिवारात जावून दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचला असता आरोपी इसम सैय्यद अमीन सैय्यद निजाम रा.जळगाव जामोद यास एका मोटार सायकल व बोलेरो पिकअप वाहनासह बनावट देशी दारूची वाहतुक करीत असतांना त्यांचे कब्जातुन 90 मिली क्षमतेचे 65 बॉक्स एवढा देशी मद्याचा साठा तसेच बोलेरो पिकअप असा एकुण 5 लाख 67 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एका आरोपी इसमास अटक करण्यात येवुन बोलेरो पिक अप गाडी चालक कृष्णा कवळकार रा.धानोरा महासिध्द व अमोल रमेश चोपड़े रा.जळगाव जामोद हे दोघेजण घटनास्थळावरुन पळुन गेल्याने त्यांना फरार घोषीत करण्यात येवुन सदरील आरोपी विरुदध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम 65 क, ड, 83 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आर.एन.गावंडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, खामगाव हे करीत आहे. असे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

खामगाव विभागाचे निरिक्षक गावंडे दुसर्‍या तालुक्यात जाऊन कारवाई करतात ही गौरवास्पद बाब आहे, यात तीळमात्र शंका नाही. पण शहरातच बनाबट विदेशी दारू विकल्या जात आहे. तसेच देशी दारूचीही विक्री होत आहे. कारण काही मद्यपीनी दिलेल्या माहितीनुसार देशीचे पिल्लूची किंमत 26 रूपये असताना काही दुकानदार चक्क 30 रूपये घेत आहेत. तर अवैध देशी दारू विके्रते 40 रूपये घेत आहेत. यासाठी त्यांना हप्ता द्यावा लागत असावा. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्यांना अभय देत आहेत. त्यामुळेच पाऊस सासरी अन पूर माहेरी असे बोलले जात आहे. हे का बोलत आहेत हे त्यांनाच माहित, पण यात काही अर्थ नव्हे तर मतितार्थ नक्कीच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.