राज्यात पुढील आठवडय़ात वादळी पावसाची शक्यता!

0

नाशिक : पुढील आठवडय़ात राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ७ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

परतीच्या पावसाची सुरुवात राजस्थानच्या वायव्येला १० ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थानातील पाऊस सध्या ओसरत असून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाच्या दीर्घकालीन अनुमानानुसार

नाशिकसह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखे पर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखेपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.