रशिया ‘या’ महिन्यात देणार डॉक्टर्स, शिक्षकांना कोरोना लसीचा पहिला डोस

0

नवी दिल्ली : सगळ्या जगाला हतबल करून सोडणाऱ्या करोनावर रशियाने विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार याच महिन्यात १० तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.एका इंग्रजी वर्तमापत्राने याविषयी माहिती दिली आहे.

गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरु आहे असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले. याविषयी बोलताना, ‘लसीच्या सर्व क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत’ असे मुराश्कोव यांनी सांगितले. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आठवड्याभरात लसीकरण सुरु होणार असून नियमानुसार या लसीच्या चाचण्या झाल्या आहेत. लस संशोधनाचा कालावधी कुठेही कमी करण्यात आला नसल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणी मागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.