रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ लसीची भारतातील किंमत जाहीर

0

 नवी दिल्ली : रशिया निर्मित ‘स्पुतनिक व्ही’ लस गुरुवारी भारतात दाखल झालीय. लवकरच ही लस लाभार्थींपर्यंत पोहचवण्यात येईल. त्यासाठी या लशीची भारतातील किंमतही जाहीर करण्यात आलीय.  आयात करण्यात आलेल्या ‘स्पुतनिक व्ही’ या लशीची किंमत जवळपास १००० रुपयांच्या घरात असेल. लसीची मूळ किंमत ९४८ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी (४७.४० रुपये) इतका दर या लसीच्या प्रत्येक डोससाठी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या लशीच्या प्रत्येक डोससाठी लाभार्थींना एकूण ९९५.४० रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु, भारतात निर्माण करण्यात येणाऱ्या ‘स्पुतनिक व्ही’ या लसीच्या डोसची किंमत मात्र थोडी कमी असू शकते.

नागरिकांना ‘स्फुतनिक व्ही’ लसीचे एकून दोन डोस घ्यावे लागतील. त्यामुळे दोन्ही डोससाठी लाभार्थींना २ हजार रुपये मोजावे लागतील. भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांना स्पुतनिक व्ही लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये देण्यात आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.