एरंडोल येथील शिक्षकाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

0

एरंडोल (प्रतिनिधी) :  येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी जयश्री किशोर पाटील यांनी पोलीस स्टेशनला गुरुवारी 10 डिसेंबर 2020 रोजी फिर्याद दिल्यावरून 302 हा  खुनाचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे . अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली

एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोणीतरी अज्ञात इसमाने किशोर पाटील कुंझरकर यांना  जीवे ठार मारण्याच्या  उद्देशाने त्यांच्यासोबत झटापट केली  त्यांना जमिनीवर खाली पाडून डोक्यात  दुखापत करून त्यांचा खून करण्यात आला. दरम्यान बुधवारी रात्री किशोर पाटील कुंझरकर हे भुसावळ येथे एका खासगी कार्यक्रमात गेले होते रात्री बारा साडे बारा वाजेच्या सुमारास परत आल्यावर ते घरी गेले त्यानंतर पहाटे पावणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास त्यांना कुणीतरी  अज्ञात इसमाने मोबाईलवर कॉल करून  बाहेर बोलावून नेले यावेळी त्यांनी मुलाला मी लगेच परत येतो असे सांगितले  या घटनेनंतर मात्र  महामार्गालगत असलेल्या लिलाधर पाटील यांच्या शेताजवळ मृतदेह आढळून  आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलीस पंचनाम्यात त्यांनी अंगात घातलेले स्वेटर व शर्टाचे तुटलेले तीन बटन आढळून आले मात्र त्यांनी घातलेले बुट त्यांचा मोबाईल घटनास्थळावर मिळून आला नाही.

सन 2010 मध्ये जालना जिल्हा परिषदेतून बदली होऊन ते जळगाव जिल्ह्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षक म्हणून ते सध्या गालापूर येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गालापूर वस्ती शाळेत ज्येष्ठ शिक्षक  असल्यामुळे त्यांचेकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार सोपविण्यात आला होता ते अधिकृत मुख्याध्यापक नव्हते जळगाव जिल्ह्यात आल्यापासून त्यांनी शिक्षक संघटनेत सक्रिय सहभाग घेतला सर्वप्रथम ते समन्वय समिती संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करू लागले ते उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते.

किशोर पाटील कुंझरकर यांच्या निधनाने एक उपक्रमशील शिक्षक गमावला गेला असून यामुळे शिक्षण क्षेत्रात काही प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्ही एच पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.