येवती येथील विवाहीत महिलेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह दिराला अटक; सासू सासरे फरार

0

बोदवड – तालुक्यातील येवती येथील विवाहीत महिलेस मारहाण करीत तिचा वेळोवेळी छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती युनुस खा युसुफ खा पठाण व दिर शाहरुख युसुफखा पठाण यास पोलिसांनी आज अटक केली असून उर्वरित आरोपी (सासू व सासरे) फरार असून त्यांचाही शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तालुक्यातील येवती हे सासर असलेल्या व बोदवड शहरातील हिदायत नगर हे माहेर असलेल्या सुलतानाबी शेख युनुस पठाण वय (२५) या विवाहात महिलेने दि.७ सोमवार रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास आपल्या येवती येथील राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली असून या प्रकरणी मयत सुलतानाबी यांचे वडील शेख नजीर शेख सत्तार वय (४०) यांनी फिर्याद दिली असून दिलेल्या फिर्यादीत वरील चारही आरोपींनी सुलतानाबी तिचा वेळोवेळी छळ करीत तिला मारहाण केली असून घर बांधण्यासाठी तुझ्या माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावून धरल्याने तिने या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येस वरील सासरची मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात चारही आरोपींविरुद्ध गु.र.नं. १२४/२०१९,भा.दं.वी.कलम ३०६,४९८,३२३,५०४,५०६(३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील खरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.