युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटलांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

0

बोदवड (प्रतिनीधी) : युवककाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम पार पडले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या जलचक्र बुद्रूक, जलचक्र खुर्द,भानखेडा,बोरगाव, रेवती या गावांतील वयोवृद्धांना किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले.भानखेडा येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला.करंजी,साळशिंगी, गोळेगाव,भानखेडा,सुरवाडे खुर्द -बुद्रूक,बोरगांव,येवती,रेवती,लोणवाडी,धोंडखेडा आर्सेनिक अल्बम होमिओपँथी गोळ्यांचे कार्यकर्त्यांकडून वाटप करण्यात आले.

बोदवड शहरातील येथील हितेश पाटिल फाउंडेशनच्या कार्यालयात मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटिल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र (भैय्यासाहेब) पाटिल तर मलकापूर येथील निवासस्थानी आमदार राजेश एकडे यांनी प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा दिल्या. बोदवड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून हितेश पाटिल यांचा सत्कार करण्यात आला.यांसह महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे,विधानपरिषद सदस्य डॉ. सुधिर तांबे,आमदार शिरीष चौधरी, अनुसुचित जाती जमाती काँग्रेस विभाग प्रदेशाध्यक्ष विजय मोरे,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटिल यांच्यासहित अन्य जणांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाभरात कार्यकर्त्यांकडून ठेवण्यात आलेले कार्यक्रम,उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचे प्रा.हितेश पाटिल यांनी यावेळी कळविले.

Leave A Reply

Your email address will not be published.