यावल शहरात महावितरणचा ग्राहकांना शाॅक

0
घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकाला 34 हजार रुपयांची बील
 
यावल ( प्रतिनिधी ) शहरातील तिरूपती नगरात राहणाऱ्या पितांबर बारकू सावकारे यांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. श्री.सावकारे यांना गेल्या सहा महिन्यांपासून घरगुती वापराचे विज देयक  गेल्या सहा महिन्यापासून 34 हजार रुपये टॅक्ससह आले आहे. या प्रकाराने यावल शहरात खळबळ उडाली आहे.
शिक्षक असलेल्या श्री.सावकारे यांच्या घरी घरगुती वापर म्हणून महावितरणने वीज जोडणी दिली आहे. जून 2019 पासून त्यांना 134 युनिटचे देयक प्राप्त होत होते. त्यांनी दोन-तीन वेळा ऑनलाइन तक्रारी दिल्या. एक वेळ सुद्धा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रारीचे निरसन केलेले नाही.
तक्रारीचे गेल्या सहा महिन्यापासून निवारण झाले नसून पूर्वीचे मीटर बिल सुस्थितीमध्ये असताना व कर्मचारी मिटर रिडींग घेऊन जात असतांना सहा महिन्यापासून एकच रेडींगचे बिल प्राप्त झाले. तसेच शंभरच्या पट्टीमध्ये आपल्या बिल आकारणीचे रक्कम ही बदलत असल्याने जास्त युनिटच्या पट्टीमध्ये जर जास्त रकमेची बिल प्राप्त झाली तर त्याला जबाबदार कोण? त्यांना प्राप्त झालेल्या जून 2019 पासून ते आक्टोबर 19 पर्यंत मागील रिडींग चालू रीडिंग हे 24 हजार 492 आकडा दाखवतो म्हणजे वापराचे युनिट फक्त 134 युनिट वापरले गेलेले आहेत असे दाखवले गेलेले आहे. तर जून 19  मध्ये नव्याने मीटर बसवण्यात आले. त्यात चालू रीडिंग शून्य व मागील रीडिंग शून्य दाखवण्यात आले होते. युनिट वापर या महिन्यात 100 युनिट वापरल्याचे दाखवले गेले असून त्याचे बिल 630 एवढे भरणा सुद्धा केलेला आहे. याबाबत कोणतीही कारवाई मंडळाकडून आजतगायत झालेली नाही. नवीन मीटर मध्ये एकूण वापरलेले रीडिंग 772 असून यांना जून 19 ते ऑक्टोबर 19 पर्यंत 636 एवढेच वापरले गेलेले आहे. मात्र, वीज मंडळ आणि 136 युनिटचे बिल न देता 2483 युनिटचे वापराचे बिल दंडासह व विविध टॅक्स सह 33, 900 रुपये एवढे देण्यात आलेले आहे. यांच्या घरांमध्ये नेमका घरगुती वापर असल्याचा दावा पितांबर सावकारे यांनी केला असून वीज मंडळाचे कर्मचारी वापरही पाहून गेलेत. मात्र, महावितरणचे अधिकारी ऑफिस सोडायला तयार नाही व तक्रारींचे निरसन करायलाही तयार नाहीत. मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे शहरात नव्याने बसवलेल्या मीटर स्थळी अनेकांचा असाच रोष आहे.  नव्याने बसविण्यात आलेल्या मीटर बाबत संभ्रम निर्माण झाला असून वीज मंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे यावल शहर वर्षे त्रस्त झालेले आहे. नेमके कुंभकर्णी झोपेत असलेले वीज मंडळाचे अधिकारी आता तरी लक्ष देतील का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
ग्राहक मंचाकडे जाणार – सावकारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी सुरू असून शहरात अवास्तव अशी देयक ग्राहकांना येत आहेत. या मनमानी विरोधात व आलेल्या विज बिल संदर्भात आपण जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असून कायदेशीर वकिलाचा सल्ला घेऊन एक दोन दिवसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे तक्रारदार पितांबर सावकारे यांनी ‘लोकशाही’ सोबत बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.