यावल येथे प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

0

यावल :- येथील दोन कोटी 78 लाख रुपये किमतीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा आज महिला दिनानिमित्त यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, सोनल निकम, मीना तडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी तहसीलदार जितेंद्र कुंवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी चिरमाडे साहेब, सर्कल महाडिक, तलाठी सूर्यवंशी, तसेच बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी विलास भाऊ चौधरी, उज्जैन सिंह राजपूत माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील व्यंकटेश बारी, गोपाल सिंह पाटील, किशोर कुलकर्णी, राकेश फेगड़े, अजय भालेराव, डांभुर्णीचे सरपंच पुरुजित चौधरी, उमेश पाटील, योगेश साळुंके इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर प्रमोद नेमाडे , विनय बढे व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.