निंभोरा येथील चौधरी माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

0

निंभोरा ता.रावेर :– येथील सौ.डि.आर चौधरी माध्य.विद्यालयात आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सायराखान मँडम यांनी प्रतिमांना पुष्पहार घालुन पुजन केले. विद्यालयातील ई.८वी ची शबनम साबिरखान या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महंती विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच यावेळी दिक्षा केदारे, प्राची मनुरे, अल्फिया शे.अकिल, अश्विनी गाढे, पुजा जाधव या विद्यार्थिनींनी वेशभुशा धारण करुन कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच साक्षी सिरसाठ या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सायराखान मँडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मत मांडले.तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच.के.नेमाडे मँडम यांनी केले. यावेऴी शाळेतील शिक्षक चंद्रकांत देशमुख सर, सुर्यकांत पाटिल, गोकुळ भोई, उदय अवसरमल, सरफराज तडवी सर तसेच मुकुंदा फालक व तुषार भंगाळे आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.