यावलमध्ये मुख्य रस्ता बंद करीत असल्याने हिंदु-मुस्लिम बांधवाचा जातीय सलोखा धोक्यात

0

यावल:- बुरूज चौकातून यावल शहरात जाणारा मुख्य सार्वजनिक रस्ता तसेच सुदर्शन चित्र मंदिराजवळून गांवात जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याबाबत कोणाचीही तक्रार नसतांना दररोज संध्याकाळी एक ते दीड तास भर रस्त्यात मधोमध बॅरेकेटस लावून किंवा मोठी पोलिस व्हॅन भर रस्त्यात आडवी उभी करून संपुर्ण वाहतुक रोखण्याचा मोठा संताप जनक प्रताप घडला. दि 8 रोजी संध्याकाळी यावल पोलिस स्टेशन समोरून बारागाडया ओढणाऱ्या भक्ताचे आधारकार्ड घेऊन काही अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करणेचा दम भरणाऱ्या पो.नि.परदेशी यांच्या मनमानी व आडमुठे धोरणामुळे संपुर्ण यावल शहरातील हिंदु-मुस्लिम बांधवाचा जातीय सलोखा धोक्यात आल्याने आमदार हरीभाऊ जावळे यांनी लक्ष्य केंद्रित करावे, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.

दि. 8 रोजी संध्याकाळी यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील बुरूज चौकात म्हणजे यावल शहरात प्रवेश करणेचा मुख्य रस्त्यावर आणि डॉ.देशमुख यांच्या दवाखान्याजवळ पो.नि.परदेशी यांनी यावल पोलीस व होमगार्ड यांच्या माध्यमातून भररस्त्यात बॅरेकेटस उभे करून संपुर्ण वाहतुक बंद केली सुमारे 1 तास संपूर्ण वाहतुक बंद होत असल्याने शहरातील सर्व-जाती धर्मातील नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच बुरूज चौकात तर मोठी पोलिस व्हॅन भर रस्त्यात आडवी उभी करून पो.नि.परदेशी यांनी आपली मनमानी व आडमुढेपणा यावलकरांना दाखविला.

वास्तविक पाहता या बुरूज चौकातील अतिक्रमण फैजपूर डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी गेल्या महिन्यात काढून टाकले होते. परंतु पो.नि.परदेशी यांच्या निष्क्रियतेमुळे या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण जैसे परिस्थितीत आहे. बुरूज चौकापासून तर गणेश बिअर चौकापर्यंत तसेच अपना बाजार प्रोव्हीजन सुपरशॉपी पर्यंत अनाधिकृत हाथगाडीवाले, किरकोळ विक्रेत्यांची भर रस्त्यावर आपली विक्री सुरू असते. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असतो. यांच्यावर कारवाई न करता पो.नि.परदेशी हे मनमानी करून सार्वजनिक रस्त्यावर बॅरेकेटस लावून, पोलिस व्हॅन भर रस्त्यात आडवी उभी करून संपूर्ण वाहतुक संध्याकाळी 1 तास बंद करून टाकीत आहे. यामुळे संपुर्ण यावल शहरातील नागरिकांमध्ये मोठया संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून हिंदु-मुस्लिम बांधवाचा ऐक्याचा मोठा जाती सलोखा धोक्यात आला आहे. यावल शहरातील कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता राखणे कामी आमदार जावळे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक जळगांव व डिवायएसपी फैजपूर यांच्यामार्फत पो.नि.परदेशी यांना समज दयावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.