यावलचे पो.नि.रविकांत सोनवणेंकडून नागरिकांच्या अनेक अपेक्षा

0

अवैद्य धंदेवाल्यांना खुर्ची आणि सामान्य नागरिकांची पिळवणूक

यावल :- पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला, गेल्या दोन वर्षाचा आढावा लक्षात घेतला असता यावल पो.स्टे.मधे अवैध धंदे करणाऱ्यांना प्राधान्य देऊन तात्काळ खुर्ची उपलब्ध करून देण्यात येते. तर अनेक प्रकरणांमध्ये तडजोडी, मध्यस्ती, दलाली करणारे दिसून येतात अश्या परिस्थितीत सामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत असते. परंतु आता पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्याकडून नागरिकांच्या अनेक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे त्या अपेक्षा पूर्ण होतील का? याकडे सर्व समाजाचे लक्ष वेधून आहे.

यावल पोलीस स्टेशन हद्दीत किंनगावात व् परिसरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणी राजकीय सामाजिक दडपण पोलिसांवर आणून सट्टा पत्ता व गावठी दारू सह इतर अवैध धंदे सर्रास सुरू आहेत याच प्रमाणे डांभुर्णि , साकळी,  दहीगाव ,अंजाळे परिसरात व यावल शहरात बोरावल गेट, सुदर्शन चित्रमंदिर भागात इत्यादी ठिकाणी सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत जळगावचे एलसीबी पथक आणि डि.वाय.एस .पी. फैजपुर चे पथक तालुक्यात तथा पोलीस स्टेशन हद्दीत येऊन कारवाई करतात आणि यावल पो.स्टे. अंतर्गत बिट जमादार व पोलिस गप्प बसतात यातच मोठे गोडरहस्य दडपून आहे , अवैध धंदेवाल्यांकडून दरमहा कलेक्शन केले जाते परंतु तो कर्मचारी (  तथाकथित देवरे नामक ) म्हणतो अवैध धंदे बंद आहेत, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्‍ह्यात कलेक्शन  गोळा करणाऱ्यांवर कारवाई केली ती कौतूकास्पदआहे, पण यावल च्या त्या कर्मचाऱ्यावर नेमकी ठोस कार्यवाही केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

यावल – भुसावळ, यावल-फैजपूर- सावदा ,रस्त्यावर मुदतबाह्य मिनीडोर रिक्षा आजही सर्रास पणे अवैध प्रवासी वाहतूक करीत आहे मिनीडोअर वाहनाची मुदत संपली असल्याने अनेक वेळा नादुरुस्त होऊन अपघात झाले आहेत, यात काही प्रवाशांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे, याच प्रमाणे अपेरिक्षा ,कालीपिली व्हान सुसाट वेगाने धावतात. काली पिली वाहनात घरगुती वापराचा गॅस कोणा कोणाच्या आशीर्वादाने भरला जातो ? पोलीस जागोजागी रस्त्यावरील वाहनांची तपासणी करतात तरी सुद्धा तालुक्यातून सागवानी लाकडाची, अवैद्य दारूची, गुरे- ढोरेरांची, गौण खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू आहे.

यावल पोलीस स्टेशनला कोणी तक्रार अर्ज करण्यास आला असता त्यासोबत दोन्ही गटांकडून मोठा जमाव एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणला जातो, आरडा ओरड केली जाते पोलिस स्टेशन मधील सीसीटीव्ही कॅमेरा मधे जमाव बंद होत. असला तरी त्यांच्यावर कार्यवाही मात्र होत नाही. वस्तुस्थिती आहे यावल शहरात बेशिस्त वाहतूक चौकाचौकात वय यावल बस स्टॅन्ड मध्ये रिकाम टेकड्यांचा मोठा ऱाडा सुरु असतो. यावल पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर तसेच गुरुच चौकात सुदर्शन चित्रमंदिर परिसरात बियरबार चौकात बोरावल गेट भागात भुसावल रोडवर मिनीडोर रिक्षा स्टॉप जवळ अनेक वेळा दारू पिऊन डाउनलोड करणारे मोठ्या मोठ्याने ओरडत असतात अनेक वेळा ठाणे अंमलदार व नागरिकांच्या महिलांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करतात, यावल शहरात मोटरसायकल चालक टिबल शीट सुसाट वेगाने विरुद्ध दिशेने धावतात यावल शहरात मेन रोडवर व एसटी स्टँड पासून बुरुज चौकात रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर किरकोळ विक्रेत्यांचे मोठे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे वाहतुकीस सुद्धा मोठा अडथळा निर्माण होत असतो. इत्यादी नागरिकांच्या समस्यांबाबत पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी आपले लक्ष केंद्रित करून ठोस कार्यवाही करावी अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.