म्हसवे गावालगत ग्रामसेवकाचा अपघाती मृत्यु

0

पारोळा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर म्हसवे गावाजवळील पुला जवळ मागून येणाऱ्या इनोव्हा  कार ने  पुढे जात असलेल्या  मोटरसायकलला धडक दिली.सदर मोटार सायकल स्वार हे रवंजे ता,एरंडोल येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते.सदर घटना ती  दिनांक 24 रोजी सकाळी उघडकीस आली .ग्रामसेवक  दिलीप काशिनाथ पाटील वय ( 55 ) रां वर्धमान नगर पारोळा  हे आपल्या मोटरसायकल क्रमांक  एम एच 19 डि ई ५२६९ ने पारोळा येथून एरंडोल कडे जात असताना मागून येणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक एम एच 43  बी ई ९८२० वरील चालक  नाव गाव माहित नाही याने  अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवून पुढे जात असलेल्या मोटरसायकलस्वार दिलीप पाटील यांना मागून धडक दिल्याने दिलीप पाटील  हे पुलाच्या खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना दिनांक 2४ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली याबाबत पारोळा  पोलिसात विजय रमेश पाटील रा . म्हसवे यांच्या फिर्यादी वरून इनोव्हा कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान मयत  दिलीप पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक इश्वर  ठाकूर , दिपक सोनार , यश ठाकूर , यांच्या सह ग्रामस्थांच्या मदतीने पारोळा कुटीर रुग्णालयात  आणण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.