सोमसिंग पाटील यांना ‘कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार

0

भडगाव (प्रतिनिधी) : कृषी उद्योग क्षेत्रात युवकांनी केलेल्या कार्याचा खऱ्या  अर्थाने  गौरव व्हावा  व त्याच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची योग्य दखल घेतली जावी ह्या हेतूने या ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन च्या वतीने कृषीथॉन-2019 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नाशिक विभागात सोमसिंग खुमानसिंग पाटील (शिवणी. ता .भडगाव, जि जळगाव) याना ‘कृषीथॉन युवा सन्मान 2019 पुरस्कार देण्यात आला. म.वि.प्र. सरचिटणीस निलिमा पवार,विक्री कर विभागाचे उपमहानिरीक्षक संजय दराडे, सुनील इनामदार, डॉ.सुरेश गंगावणे, विमल न्याहारकर, आयोजक संजय न्याहारकर, जितेंद्र अ. पाटील संचालक  आदींसह कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.केलेले कार्य शिवणी ता.भडगाव जि जळगाव गावा  मध्ये पदमालया फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून त्यामध्ये सर्व प्रकारचे बियाणे उत्पादित करून त्याची प्रोसेसिंग व पॅकिंग करून चांगल्या प्रकारे बियाणे विक्री करणे. त्या केलेल्या कामामुळे कंपनीला iso प्रमाणित मिळवले.

व एका खेड्या गावातून एका तरुणाने  पुढे येऊन उद्योग उभारा.तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात भाग घेण्यास प्रोरसाहितकरणे.

त्यांना  याचे मार्गदर्शन लाभले संभाजी ठाकूर  (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)श्री अनिल भोकरे  (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)व श्री हितेंद्र सोनवणे  विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी श्री. झोपे  जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी व एस. टी. पाटील जिल्हा बीज प्रमाणीकरण जळगाव याचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.