भुसावळात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी

0

भुसावळ (प्रतिनिधी) -येथील शिवशक्ती हुडको कॉलनीतील  अज्ञात चोरटयानी बंद घराला टार्गेट करीत कुलुप तोडून घरफोडी करीत घरातील टीव्ही सह सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कमे वर  डल्ला मारुन पोबारा केल्याची घटना येथे 24 रोजी रविवारी उघडकिस आली .मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

तुळजा भवानी मोटर गॅरेजचे मालक राजेंद्र  वाघ हे आपल्या कुटुंबासह 21 नोव्हेबर रोजी नातेवाईकांच्या घरी औरंगाबाद येथे लग्नासाठी गेलेले होते.दिनांक 23 नोव्हेंबर 19 रोजी सायंकाळी 07:30 वाजेच्या सुमारास सर्व परिवार औरंगाबाद येथे लग्न समारंभाच्या ठिकाणी असतांना घरासमोरील राहणारे रामदास दामू बागुल यांनी फोनव्दारे  चोरी झाल्याचे कळविले.

आज रविवार 24 रोजी ते घरी आले असता  घरातील  एल. ई. डी. टीव्ही,चांदीचे पायल, चांदीचे शिक्के,सोन्याची पोत,चांदीचे लहान बाळाचे तीन नग,रोख रक्कम तीन हजार रुपये असा अंदाजे चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकिस आले . याबाबत अभिजीत राजेंद्र वाघ यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ सुनील जोशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.