मोहन भुवन प्रतिष्ठानची सेवा निस्वार्थी भावनेतून

0

जामनेर (प्रतिनिधी) : गेंदा बाई मोहनलाल लोढा मोहन भुवन प्रतिष्ठान ची सेवा ही निस्वार्थी भावनेतून  असून प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ यांची गोरगरिबां विषयी असलेली आत्मीयता ,तळमळ ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे .असे उद्गार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांनी काढले. मोहन भुवन प्रतिष्ठान तर्फे कमल मोहन राशन किट योजनेअंतर्गत अध्यक्ष विनोद कुमार लोढा व संचालिका  सौ वंदना जी लोढा यांचे हस्ते आज  272  गरजूंना राशन कीटचे  वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते .

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी ,संचालक गोपाल जी देशपांडे उपस्थित होते.

अध्यक्ष विनोद कुमार लोढा  पुढे म्हणाले की लॉक डाऊन च्या काळात तालुक्यातील व जिल्ह्यातील 17000 गरजूंना  जीवनावश्यक वस्तूंचे राशन किट देऊन मोहन भुवन प्रतिष्ठान ने  समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षभरापासून लॉक डाऊन संपल्यानंतर ही  कार्य थांबले नाही. तर जीवन जगण्यासाठी ज्यांना कुणाचाही आधार नाही अशा लाभार्थींची निवड करून प्रतिष्ठान ने त्यांना मदतीचा हात देऊन जगण्याचा नवा आनंद मिळवून दिला आहे. इतकेच नव्हे तर प्रतिष्ठान तर्फे ज्या निराधार महिला आहेत त्यांना गोळ्या औषधे साठी सुद्धा पैसे नसतात अशा निराधारांना आधार म्हणून प्रतिष्ठान तर्फे दर महिन्याला 500 रुपये रोख स्वरूपाची मदत दिली जाते .अशा 90 लाभार्थ्यांची निवड या योजनेत करण्यात आली असून त्यांना हि प्रतिष्ठानने मदतीचा हात दिला आहे .प्रतिष्ठानचे हे कार्य पाहून शहरातील व तालुक्यातील काही दाते पुढे आले असून या ईश्वरी कार्यस  त्यांचेही सहकार्य लाभत असल्याचे  अध्यक्ष विनोद कुमार लोढा  म्हणाले . या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संचालक गोपाल जी देशपांडे, रतन सिंह राणा, दीपक जी देशमुख जितूभाई पालवे ,निलेश कासार ,किरण इंगळे,आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.