भयंकर ! देशात पहिल्यांदाच रुग्ण संख्येने ओलांडला एक लाखांचा टप्पा

0

नवी दिल्ली : देशातील कोरोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच कोरोना संक्रमित रुग्णांच्या एका दिवसाच्या आकड्यानं एक लाखांचा टप्पा ओलांडलाय.  देशात यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक संख्येची नोंद करण्यात आली होती. या दिवशी देशात एका दिवसात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२ हजार ८४७ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात करोनाचे ५७ हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत तर २२२ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रविवारी करोना संक्रमणाचे ५७ हजार ०७४ रुग्ण आढळले. ही एखाद्या राज्याची एका दिवसातील सर्वाधिक संख्या ठरलीय. महाराष्ट्रात आतापर्यंत ३० लाख १० हजार ५९७ जणांना करोना संक्रमणानं गाठलंय.

महाराष्ट्रातील ११ हजार १६३ करोना संक्रमित रुग्ण केवळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आढळले आहेत. तर शहरात २५ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.