मोर्शीत ‘स्वाभिमानी’च्या उमेदवाराला मारहाण; कार पेटवली

0

अमरावती: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

मोर्शी मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार हे सकाळी कारमधून मालखेड गावाकडून निघाले होते. वरुडपासून सहा किलोमीटरवर असलेल्या एका गावाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. तीन ते चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळते. तीन-चार जणांनी त्यांची कार अडवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. भुयार यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची कार पेटवून देण्यात आली. रस्त्यावर सुरू असलेला हा प्रकार पाहून गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ते धावून येताच मारेकऱ्यांनी जवळच्या शेतातून पळ काढला. भुयार यांची कार जळून खाक झाली आहे. तसंच भुयार यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.