मोठी बातमी.. पहिलीपासून सर्व वर्ग ‘या’ तारखेपासून सुरू होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

इयत्ता पहिली ते इयत्ता सतावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळा सुरु कराव्यात किंवा नाही. याबाबत राज्य सरकारसह विविध पातळीवरही दुमत होते. मात्र, राज्यातील कोरोना संसर्गाचे घटते प्रमाण विचारात घेता राज्य सरकारने या शाळा सुरु करणयाचा निर्णय घेतला आहे.

राज्या सरकारच्या या निर्णयामुळे आता इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा पूर्णपणे सुरु होणार आहेत. महाविद्यालये यापूर्वीच सुरु झाली आहेत. अर्थात या शाळा सुरु होणार असल्या तरी कोरोना नियमांचे पालन कटाक्षाणे करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापण आणि शिक्षक, पालकांवर असणार आहे.

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवी या शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी लागणारी तयारी या काळात आम्हाला करता येईल. यापुढे महाराष्ट्रात पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील. अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे. दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिलीय.

प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.