मुस्लिम धर्मगुरू बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा

0

पाचोरा (प्रतिनिधी) : १६ जुन २०२० रोजी न्युज – १८ चे निवेदक अमिष देवगन यांनी एका लाईव्ह चर्चेवेळी भारताचे सुफि संत हजरत ख्वाजा मोइनोद्दीन चिस्ती, अजमेर यांना अतिरीकी संत व “लुटेरा चिस्ती” असे संबोधून इस्लाम धर्माचे तसेच ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचे देश-विदेशात असलेल्या लाखो श्रद्धाळूंची धार्मिक भावना दुखावलेली आहे. व त्याचे प्रसारण केलेले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असे नगरदेवळा येथे दि. १८ जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे. अमिश देवगण हा नेहमी एक धर्म विशेष व धार्मिक भावना दुखावण्यास कारणीभूत असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण करीत असतो.

यापूर्वीही त्याने एक धर्म विशेषच्या एका विशिष्ट वर्गाविषयी उलट सुलट आरोप लावणारे कार्यक्रम या दूरचित्रवाणीच्या माध्यमाने प्रसारित केलेले आहे. तसेच सुफी संतांचा अपमान करून धार्मिक भावना दुखविलेल्या आहे व त्याचे प्रसारण केलेले आहे. त्याच्या या कृत्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी गरीब नवाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर अमीर शेख, ग्रामपंचायत सदस्य नुर बेग, अन्नू मेंबर, जिब्राईल शेख, मुझफ्फर अली, वसीम बेग व मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.