मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त – रणदीप सुरजेवाला

0

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर कॉंग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यामधील कारमध्ये 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याचे कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी सागितले. आज नवी दिल्लीत कॉंग्रेसने पत्रकार परिषद ते बोलत होते.

रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले, यासंबंधीचा व्हिडीओ दाखविला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत चौकीदाराची चोरी पकडण्यात आली, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.