मुक्ताईनगर येथे निष्ठा प्रशिक्षण उत्साहात संपन्न ।

0

मुक्ताईनगर येथे नियोजनानुसार

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :३० डिसेंबर २०१९ ते दि १८ जानेवारी २०२०पर्यंत तीन टप्प्यांमध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. या कालावधीमध्ये 3 टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक टप्प्यामध्ये शिक्षक संख्या पहिला टप्पा 117 दुसरा टप्पा123,तिसरा टप्पा 125असे एकूण 365 शिक्षक व पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे 5 दिवसीय प्रशिक्षणाचे तीन टप्पे देण्यात आले यावेळेस प्रशिक्षणामध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला त्याचे कारण असे की राज्य स्तरावरील मार्गदर्शक यांनी थेट तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले त्यामुळे राज्यावरून जेवढे काही मिळाले तेवढे सर्व तालुक्यात पर्यंत थेट देता आले पाच दिवसीय प्रशिक्षणात पहिल्या दिवसापासून तर पाचव्या दिवसापर्यंत चा शिक्षकांचा उत्साह कायम होता प्रशिक्षण कालावधी मध्ये दररोज दोन वेळा चहा एक वेळा अल्पोपहार चांगल्या प्रकारचा पुरविण्यात आले. प्रशिक्षणाकरिता पहिल्या टप्प्याचे नियोजन जे स्कूल मुक्ताईनगर येथे करण्यात आले तसेच दुसरा व तिसरा टप्पा स्व.निखील भाऊ खडसे इंग्लिश मीडियम स्कूल येथे करण्यात आला होता सदरचे प्रशिक्षणात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, जिल्हा समन्वयक डॉ.राजेंद्र महाजन, तालुका समन्वयक डॉ.मंगेश घोगरे तसेच गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ सी.धनके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक म्हणून श्री अनिल कुमार पाठक केंद्रप्रमुख आणि सह समन्वयक म्हणून विनोद कोळी समावेशीत तज्ञ यांनी कामकाज पाहिले प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून डॉ.मंगेश घोगरे ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव ,श्री योगेश भोसले श्री रवींद्र बावनकुळे श्री भगवान कांबळे श्री संतोष धनगर श्री भूपेंद्र दहिवले यांनी केलेले मार्गदर्शन खूपच छान आणि प्रभावी असल्याबाबत शिक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या. प्रशिक्षणाचे दुसऱ्या टप्प्यात चौथ्या दिवशी दिनांक रोजी माननीय प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाचे नियोजन कामी महेंद्र मालवेकर जिजाबाई झाडे विषयतज्ञ आणि राजू तडवी संजय ठोसर केंद्रप्रमुख यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.