मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी 

मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी आर पी पाटील तर उपाध्यक्षपदी आय आय शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आज मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल येथे मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची बैठक पार पडली. त्यात पुढील प्रमाणे निवड करण्यात आली आहे.  तालुका अध्यक्षपदी जे ई स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आर पी पाटील , उपाध्यक्ष पदी मुक्ताईनगर येथील अल्फालाह उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक आय आय शहा सचिव म्हणून  कुऱ्हा स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक हायस्कूलचे व्ही एस चौधरी , तर सदस्य म्हणून हरताळा हायस्कूलचे आर के पाटील कुऱ्हा शिवाजी हायस्कूलचे एस डी ठाकूर , घोडसगाव पूर्ण महाविद्यालयाचे एम पी संग्रामपूरकर , तर महिला प्रतिनिधी म्हणून निमखेडी खुर्द येथील हायस्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती यू.पी. कोंगे अशी निवड करण्यात आली आहे. नवीन कार्य करण्याचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.