मुक्ताईनगरात जनता कर्फ्युला प्रतिसाद

0
देवेंद्र काटे प्रतिनिधी

मुक्ताईनगर : चीन देशात कोरोनाच्या धर्तीवर हतबल झालेल्या नागरीकांनी जनता कर्फ्यु सारखी अभिनव कल्पना राबवून मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराला आटोक्यात आणले .त्याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्यातील कोरोना परिस्थितीवर दररोज नियोजन व उपाय योजना करीत आहेत .त्यात चीन च्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यु चे आवाहन देशातील नागरिकांना केले होते . त्यानुसार देशभरातील नागरिक या जनता कर्फ्युत सहभागी झालेले दिसून येत आहेत . जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात देखील नागरिकांनी स्वतःला घरात ठेवून घेतल्याने जनता कर्फ्यु यशस्वी केला असून शहरात कौतुकास्पद कडकडीत बंद व शुकशुकाट दिसून येत आहे .कोरोनाच्या रूपाने देशावर आलेल्या महाभयंकर आपत्तीला एक पाऊल घरातच ठेवून नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे .

काय आहे जनता कर्फ्यु
जनता कर्फ्यु मध्ये नागरिकांचा एकमेकांशी तब्बल 14 तास संपर्क येणार नाही .अशात कोरोना बाधित रुग्णांकडून स्पर्श झालेल्या काही वस्तू व ठिकाणांवर हा कोरोना विषाणू तब्बल 12 तास जिवंत राहतो त्यामुळे जनता कर्फ्युतील ते 14 अत्यंत महत्वाचे असून या काळात हे विषाणू 12 तासात नष्ट होतील व देशावर आलेले हे संकट यशस्वीपणे परतविले जाईल . चीन जरी कोरोना सारख्या महाभयंकर कोरोना ला जन्म घातला असला तरी त्याला कसा आटोक्यात आणायचे हे जनता कर्फ्युतून दाखवून दिले आहे .त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाला पळवू या व रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यु यशस्वी करूया असा चंग नागरिकांनी बांधलेला दिसुम येत आहे .
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सेवा बजावण्यासाठी सज्ज आहे .कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून आल्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राणे यांनी केले आहे .
मुक्ताईनगरातील यशस्वी जनता कर्फ्युची काही क्षणचित्रे

Leave A Reply

Your email address will not be published.