मुंबईसाठी दिलासादायक बातमी : नव्याने होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटतेय

0

मुंबई राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची  संख्या सर्वाधिक आहे. मात्र, आता मुंबईत कोरोनाची लाट आता ओसरत चालली आहे. मुंबईत आता नव्याने होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 च्या आत आली आहे.

 

मुंबई महापालिकेनं  दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.  नव्याने होणाऱ्या कोरोनाबधितांची संख्या आता हजाराच्या खाली आली आहे.  सोमवारी मुंबईत केवळ 804 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. त्यामुळे आजवर कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 252087 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत 19 ते 25 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण हे 0.53 टक्के इतकं राहिले आहे.

 

या नव्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे रोज मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या संख्येतही घट झाली आहे. सोमवारी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 37 आहे. तर मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळे 10099  जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.