निपाण्याची कु.हेमश्री महाले नाशिक बोर्ड परीक्षेत चोपडा तालुक्यातून प्रथम

0

निपाणे ता, एरंडोल (वार्ताहर) : निपाणे येथील रहिवासी तथा चोपडा विवेकानंद माध्यमिक विद्यालयाची इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु, हेमश्री गौरव महाले ह्या विद्यार्थिनी ने नाशिक बोर्डाच्या परीक्षेत संगीत व कला विषयात ९८: ८० टक्के गुण मिळवून चोपडा तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला दि, २९ जुलै२०२०  रोजी घोषीत झालेल्या नाशिक माध्यमिक बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात विवेकानंद विद्यालय चोपडा विद्यालयाची विद्यार्थिनी कु, हेमश्री गौरव महाले हिला ९५: ८० टक्के गुण दिले होते.

 

परंतु या विद्यार्थिनीने संगीत व कला विषयात विशेष प्राविण्य बध्दलचे मिळणारे अतिरीक्त १५ गुण ब बोर्डाने दिले नव्हते याबाबत पालक गौरव महाले व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा, नरेंद्र भावे  यांनी प्रत्यक्ष नाशिक येथे जावून सदरची चुक बोर्डाच्या निदर्शनास आणून दिली बोर्डाने सदरची चुक मान्य करुन अतिरिक्त १५ गुण मान्य करुन नविन मार्क शिट तयार करून एकूण ५०० गुणापैकी ४९४ गुणांचे म्हणजेच ९८:८० टक्के गुणांचे मार्क शिट दिले आहे.

 

त्यामुळे सदर विद्यार्थिनी कु, हेमश्री महाले ही चोपडा तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्यास अधिकृत पात्र ठरली आहे कु,हेमश्री महाले ही शारदा (म्याथस)  क्लासचे संचालक प्रा, गौरव महाले जयश्री महाले यांची कन्या असून निवृत्त कृषी अधिकारी प्रकाश  रामदास पाटील निपाणे यांची नात आहे हेमश्रीच्या यशाबद्दल विवेकानंद विद्यालयाचे अध्यक्ष संचालक मंडळ मुख्यध्यापक सह शिक्षकवृंद तसेच  पत्रकार लक्ष्मण   पाटील व निपाणे  परीसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.