मा.आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या वतीने अमळनेरला मिळाले दोन ऑक्सिजन मशीन

0

अमळनेर (प्रतिनिधी) : ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन व मा. आमदार आप्पासो जगन्नाथजी शिंदे यांच्या वतीने राजमुद्रा फाउंडेशनच्या मागणीवरून अमळनेर साठी दोन ऑक्सिजन मशीन मिळाले आहेत.

अमळनेर तालुका व परिसरात covid-19 चा प्रादुर्भाव अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. अश्या परिस्थितीत अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसून, हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालेत.बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे.

याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकीने ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन व मा. आमदार आप्पासो जगन्नाथजी शिंदे यांच्या वतीने राजमुद्रा फाउंडेशनच्या मागणीवरून अमळनेर साठी दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी श्री विजय सुराणा  (ठाणे जिल्हा सेक्रेटरी)  , अजित पारख (पी.आर.ओ.) व भूषण भदाने ( प्रदेशाध्यक्ष फार्मसी स्टुडंट कौन्सिल ) उपस्थित होते.राजमुद्रा फाउंडेशन व नगरसेवक शाम पाटील यांच्या मागणीला यश मिळाले असून रुग्णांची हेळसांड थांबणार आहेत.

यापैकी एक ऑक्सिजन मशीन सध्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.