भुसावळ विभागातील 33 कर्मचारी सेवानिवृत्त

0

भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 31.03.2021 रोजी 33 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले,  सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे 7 कोटी 92 लाख त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स. कार्मिक अधिकारी बी एस रामटेके यांनी केले

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे करण्यात आले तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन ,नांदगाव,भुसावळ ,मनमाड,नाशिक,बडनेरा बुरहानपुर, इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक  विवेक कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी  एन.डी.गांगुर्डे , रेल्वे स्कूल प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे धन्यवाद स.कार्मिक अधिकारी बी एस रामटेके यांनी केले

कार्यक्रम यशस्वितेसाठी निपटान, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.