मालवाहतुक-दुचाकीची समोरासमोर धडक ; एका चिमुकल्याचा जागीच मृत्य

0

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील बहादरवादी फाट्याजवळ मालवाहतूक गाडी व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने एका लहान बालकाचा जागीच मृत्य तर त्याच्या पित्याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सविस्तर वृत्त असे की अमळनेर कडून पारोळा कडे मोटारसायकलिवर परिवारासह जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाच्या धडकेने श्रावण अमोल पावरा याचा जागीच मृत्यू झाला व अमोल ऐरा पावरा, पत्नी रेखा अमोल पावरा तसेच सोबत असलेल्या जनाबाई बखिरा पावरा सर्व राहणार बडवानी (मध्य प्रदेश) यांना जबर मार लागल्याने रस्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी जखमींना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी उपचारादरम्यान अमोल पावरा यांचा मृत्यू झाला असून रेखा अमोल पावरा तसेच सोबत असलेल्या जनाबाई बखिरा पावरा यांना जबर मार लागल्याने व त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. माल वाहतूक वाहन चालक फरार झाल्याने अमळनेर पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंद होत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.