माणसाला तारणारा भागवत ग्रंथ – भागवताचार्य सुधीर महाराज

0

जळगाव  –
मनुष्याला भवसागरपार करणारा तसेच तरूणोपाय सहज व सुलभरित्या करून देणारा ग्रंथराज भागवत ग्रंथ आहे असा गौरव श्रीमद भागवत ग्रंथाचा भागवताचार्य सुधीर महाराज यांनी भागवत कथेत केला.
श्री सदगुरू दादाजी धुनिवाले दरबारात गेल्या पाच दिवसापासुन श्रीमद भागवत कथा सुरू आहे. श्रोत्यांना भागवत कथेचे महत्व पटवुन देतांना सुधीर महाराज आपल्या मधुर वाणीतुन बोलत होते. प्रेताआत्माला सुद्धा सदगती करून देणारा भागवत ग्रंथ आहे. संत गोर्कीण यांच्या बंधूंना मोक्ष प्राप्ती करून देणारा भागवत ग्रंथ आहे यासह अनेक दाखल देवुन भागवत ग्रंथाचे महत्व महाराजांनी सांगितले. जळगाव खेडी येथील श्री धुनिवाले दादाजी दरबारात सदगुरू दादाजी महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त भागवत कथा सुरू आहे. तसेच 18 डिसेंबर रोजी काल्याचे किर्तन होऊन कथेची समाप्ती होणार आहे आणि 20 रोजी दादाजी महाराजांची भव्य शोभायात्रा
दि. 12 डिसेंबर बुधवार रोजी श्री दादाजी धुनिवाले महाराज यांच्या वार्षिक उत्सावानिमित्त कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे. श्री हरिहर नित्य सेवामंडळ संचलित श्री दादाजी दरबार खेडी येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर पासुन श्री दादाजी विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण व भागवत कथेला सुरूवात करण्यात आली आहे. कथा सकाळी 9 ते 12 व दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. 20 डिसेंबर गुरूवारी

Leave A Reply

Your email address will not be published.