माझे कुटुंब ,माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या मानधनापासून स्वंयमसेवक वंचित

0

मनवेल ता.यावल (वार्ताहर) : आँक्टोबंर २०२० मध्ये मुख्यंमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा संकल्पनातुन राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमचे ४२ दिवस सर्वेक्षण करुनहि स्वंयमसेवक मानधनाच्या प्रतिक्षेत आहे.

एक स्वंयमसेवक , आशा स्वंयमसेविका व जि.प.शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक गावात ४२ दिवस कोवीड १९ च्या संर्वेक्षण जीवाची पर्वा नकरता घरोघरी जावुन ग्रामस्थांच्या   थर्मामीटरने तापमान व आँक्सीमीटरने तपासणी केली मात्र स्वंयमसेवक व शिक्षकांना अद्यापही माझे कुटुंब , माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या मानधन मिळाले नाही.

कोवीड १९ या महामारीला घाबरुन अनेक कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या सर्वेक्षणाच्या कामी  नियुक्त करण्यात आले होते मात्र विविध आजाराची कारणे दाखवुन कर्मचाऱ्यांनी नियुक्ती रद्द केल्या व स्वंयमसेवक नियुक्त करण्यात आले मात्र त्या स्वंयमसेवक व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अद्यापही माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे स्वंयमसेवका मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आशा स्वंयमसेविका यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणाच्या कामाचे मानधन वाटप करण्यात आले. स्वंयमसेवक व शाळेतील शिक्षक यांना मानधन नसल्यामुळे वाटप करण्यात आले नाही

डाँ हेमंत बर्हाटे
तालुका वैद्यकीय अधिकारी, यावल

अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक यांनी आजाराचे कारण दाखवुन माझे कुटुंब माझी जबाबदारीसाठी सर्वेक्षणाच्या कामातुन सुटका करुन घेतली.त्याच्या जागेवर सर्वेक्षणाच्या कामी स्वंयमसेवक म्हणून ४२ दिवस काम केले मात्र सहा महीण्यापासुन मानधनाच्या प्रतिक्षेत आहे.

गोकुळ कोळी
स्वंयमसेवक मनवेल

Leave A Reply

Your email address will not be published.