पत्रकार सुर्यभान पाटील यांचे कोरोनामुळे निधन

0

जळगाव प्रतिनिधी । पत्रकार तथा कॅमेरामॅन सुर्यभान पाटील यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे.

शहरातील महत्वाच्या घडमोडीसाठी नेहमी तत्पर, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व, इतरांसाठी नेहमी मदतीसाठी धावणारा पत्रकार आज काळाने हिरावून घेतला आहे. त्यांना गेल्या १० ते १५ दिवसांपासून कोरोना झाला होता. त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.उपचार सुरु असताना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.