महिला सक्षमीकरणात धनाजी नाना महाविद्यालयाचे भरीव कार्य – प्रा ऍने (ऑस्ट्रेलिया)

0
 सध्या जगभरात महिला सबलीकरणाचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे यासोबत फैजपूर सारख्या ऐतिहासिक भूमीतील धनाजी नाना महाविद्यालयाचे महिला सबलीकरणाचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सक्रिय सहभागातून महाविद्यालयातील वातावरण अत्यंत सकारात्मक असून इतर संस्थांसाठी हा एक आदर्श आहे. असे कौतुकास्पद उद्गार प्रोफेसर  एने (ऑस्ट्रेलिया) यांनी व्यक्त केले. सामाजिक संशोधन संबंधित महिला सशक्तिकरण हा विषय घेऊन ऑस्ट्रेलिया येथील तीस संशोधकांची ची टीम अभ्यास दौरा करीत आहे. त्यादरम्यान त्यांनी धनाजी नाना महाविद्यालया ला भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा ए आय भंगाळे, प्राध्यापक लेफ्ट राजेंद्र राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सर्व संशोधकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेंद्र राजपूत यांनी केले. यावेळी सहभागी संशोधकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून महिला सबलीकरणात महाविद्यालयाची भूमिका समजून घेतली  त्यांच्या प्रश्नांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी यांनी प्रतिसाद दिला.  यावेळी  बोलताना  प्राचार्य  डॉ पी आर चौधरी  यांनी  दादासाहेब धनाजी नाना चौधरी  यांच्या  स्वातंत्र्यपूर्व काळातील  योगदाना संबंधी  विस्तृत माहिती दिली . याबरोबरच लोकसेवक मधुकरराव चौधरी  यांची महत्वाची शिक्षण क्षेत्रातील भूमिका  विशद केली.  हाच समृद्ध वारसा  आमदार  शिरिष दादा चौधरी  समर्थपणे चालवत आहेत असे सांगत  त्यांच्या कार्याचे  विविध दाखले  उपस्थितांना  दिले. यासोबत महाविद्यालयात महिला सबलीकरण साठी आयोजित विविध कार्यक्रम संबंधि माहिती दिली. या संवादातून ऑस्ट्रेलिया येथून आलेली संशोधकांची टीम समाधानी होऊन त्यांनी महाविद्यालयातील विदयार्थ्यांशी संवाद साधला व  महाविद्यालयाच्या उज्वल इतिहास चे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या यशस्वीतेसाठी श्री नितीन सपकाळे, चेतन इंगळे,  शेखर महाजन, सिद्धार्थ तायडे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.