भुसावळ पंचायत समितीवर भाजपाचेच वर्चस्व !

0
मनीषा पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता
भुसावळ (प्रतिनिधी )-
 पंचायत समिती सभापतीचे सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहिर झाल्याने या पदावर आता मनीषा पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता असून पंचायत समिती पुन्हा भाजपाकडे राहणार आहे. पंचायत समितीच्या सहा जागांपैकी चार जागांवर भाजपचे वर्चस्व आहे, तर राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा असल्याने भाजपचे बहुमत कायम आहे. नवीन आरक्षणानुसार वराडसीम गणाच्या सदस्या मनिषा भालचंद्र पाटील यांना संधी मिळणार आहे.
      भुसावळ तालुक्यातील साकेगाव-खडका गणातून प्रीती पाटील, कुर्हा गणातून सुनील महाजन, वराडसीम गणातून मनीषा भालचंद्र पाटील, हतनूर गणातून वंदना उन्हाळे असे चार सदस्य भाजपच्या आहेत तर तळवेल गणातून विजय सुरवाडे शिवसेना व कंडारी गणातून राष्ट्रवादीच्या आशा संतोष निसाळकर विजयी झाल्या आहेत.
पंचायत समिती भाजपाकडेच
भाजपने यापूर्वी कुर्हा गणातून विजयी झालेले सुनील महाजन व नंतर साकेगाव खडका गणाच्या सदस्य प्रीती पाटील यांना सभापती पदाची संधी दिली होती. सध्या प्रीती पाटील या सभापतीपदी कायम आहेत. यापूर्वी भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे पुढील टर्मची संधी वराडसीम गणातील मनिषा भालचंद्र पाटील यांना दिली जाणार होती, योगायोगाने आरक्षण देखील सर्वसाधारण महिला असे निघाल्याने मनिषा पाटील यांना सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.