महाराष्ट्रात एनडीआरएफची दहा पथके तैनात- मुख्यमंत्री

0

मुंबई : निसर्ग वादळ बुधवारी महाराष्ट्राला धडक देण्याची शक्‍यता असून मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दहा फथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ट्‌विटरवर ही माहिती दिली आहे.

मुंबई आणि उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अतीसतर्कतेचा आदेस देण्यात आला आहे.


या काळात मदतकार्य करताना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर घ्यावयाची सावधानता सांभाळण्यात येत आहे. एनडीआरएफच्या 16 पथकांपैकी 10 पथके मदत कार्यासाठी तैनात करण्यात येणार असून अन्य पथके राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची सहा पथकेही मदत कार्यासाठी राखीव असतील. या काळात कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.