महाराजस्व अंतर्गत विधवा महिलांना आर्थिक सहाय्य

0

धरणगाव — येथील तहसिल प्रशासन धरणगाव आयोजित महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजस्व अभियान व उभारी योजने अंतर्गत’ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आणि कुटुंब लाभ योजनेत पात्र लाभार्थी यांना धनादेश, शिलाई मशिन, पिठाची चक्की, किराणा किट व साडी देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ महिला भगिनींना सन्मानित करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियान व उभारी योजनेची यशस्वी अंमलबजावणी करत तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या माध्यमातून एक अतिशय संवेदनशील कार्यक्रम संपन्न झाला. वेद वाचणं सोपं आहे, वेदना वाचता आल्या पाहिजेत. व्यक्ती गेल्याची भरपाई कदापि निघू शकत नाही परंतु शासनाच्या आर्थिक सहाय्यातून आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मिळालेली मदत जगण्याची उमेद देऊन जाते.

शासनाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच तुमचे दुःख आणि समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पालकमंत्रांच्या हस्ते धनादेश व साहित्य वाटप करण्यात करण्यात आले. या योजनेसाठी ३ प्रकरणे मंजूर झाली होती. यामध्ये अहिरे येथील मिनाबाई देविदास पाटील, वाकटुकी येथील वंदना श्रीराम पाटील, रोटवद येथील सुमनबाई प्रकाश पाटील यांना लाभ मिळाला. यामध्ये पात्र लाभार्थी महिलांना ३० हजार रकमेचा धनादेश, शिलाई मशिन, किराणा किट व साडी देऊन गौरविण्यात आले. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणुन विधवा महिलांच्या उदरनिर्वाहसाठी शिलाई मशिन व पिठाची चक्की दात्यांमार्फत देण्यात आले. यामध्ये भिकन रामदास पाटील (बांभोरी प्रचा), भगवान आसाराम महाजन (धानोरा), प्रेमराज मधुकर पाटील (बांभोरी बु.) या दात्यांचा समावेश आहे. कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी २ शिलाई मशिन देण्याची घोषणा केली. कुटुंब लाभ योजनेमध्ये पात्र लाभार्थींना देखील याप्रसंगी धनादेश व साहित्य वाटप करण्यात आले.

यामध्ये अमीना बी खान (पाळधी बु.), रेखाबाई पाटील (धरणगाव), मंगला माळी (धरणगाव), अनिताबाई पाटील (धरणगाव), आशाबाई भोई (धरणगाव), मिनाबाई पाटील (अहिरे बु.), कल्पना अमृतकर (साकरे), उषा नन्नवरे (बांभोरी प्रचा), रत्नाबाई पाथरवट (वाघळूद खु.), रेखाबाई पाथरवट (वाघळूद खु.), सोनिया सोनवणे (वराड बु.), शोभाबाई पाटील (वराड बु.), संगिताबाई चांभार (वराड बु.), संगिताबाई वाडले (वराड बु.), संगिता पाटील (बोरगाव बु.), सुमित्रा सुर्यवंशी (बोरगाव बु.), मोनल बडगुजर पिंप्री खु.), उषा सोनवणे (हणुमंतखेडा), शोभाबाई पाटील (टहाकळी खु.), देवकाबाई सैंदाणे (पिंपळेसिम) या सर्व महिला भगिनींना २० हजार रकमेचा धनादेश, किराणा किट व साडी देऊन सन्मानित करण्यात आले. धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या संकल्पनेतून उभारी योजने अंतर्गत या सर्व २३ महिलांना गृहोपयोगी किराणा साहित्याचे किट व साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रभारी नगराध्यक्षा कल्पना महाजन, पंचायत समिती सभापती मुकुंदभाऊ नन्नवरे, उपसभापती शारदा प्रेमराज पाटील, प्रांत अधिकारी विनयजी गोसावी, तहसिलदार नितीनकुमार देवरे, निवासी नायब तहसिलदार सातपुते रावसाहेब, मंडळ अधिकारी वनराज पाटील, प्रसिध्द उद्योजक व माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, प्रसिध्द कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन, बांभोरी बु. चे माजी सरपंच प्रेमराज पाटील, बांभोरी प्रचा चे ग्रा.सदस्य भिकन नन्नवरे, भोणे येथील पुंडलिक पाटील, धरणगावचे रविंद्र कंखरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम तहसिल कार्यालय धरणगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिल प्रशासन धरणगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव चे सहसचिव लक्ष्मण पाटील सरांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.